सुशांत मृत्यू प्रकरण : सत्य लवकरच समोर येईल; सुरेश रैनाने व्यक्त केला विश्वास


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपुतच्या मृत्यूला आता जवळपास दोन महिने पूर्ण झाले आहेत. ईडी आणि सीबीआयमार्फत या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. मात्र सुशांतच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान भारतीय क्रिकेट खेळाडू सुरेश रैना याने सुशांत मृत्यू प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणातील सत्य लवकरच समोर येईल असं त्याने म्हटलं आहे.

सुशांत प्रकरणातील सत्य समोर यावं यासाठी काही बॉलिवूड कलाकार व चाहत्यांनी सोशल मीडियावर ‘जस्टिस फॉर सुशांत’ अशी एक मोहिमच सुरु केली आहे. या प्रकरणावर सुरेश रैनाने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. त्याने सुशांतसोबतचा एक फोटो पोस्ट केला आहे. “भरपूर दु:ख आहे पण सत्य लवकरच समोर येईल. #जस्टिस फॉर सुशांत सिंह राजपूत” अशा आशयाची कॉमेंट त्याने या फोटोवर केली आहे. रैनाची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post