कोरोना मृतांची खरी आकडेवारी द्या; मनपात आंदोलनानंतर आयुक्तांचे आदेश

 
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : नगर जिल्ह्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण हे जास्त आहे. मात्र, मृत्यूदर कमी दाखवला जातोय, असा आरोप करीत काँग्रेसचे माजी नगरसेवक निखील वारे, बाळासाहेब पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक सुनिल त्रिंबके, सामाजिक कार्यकर्ते फारुख शेख यांच्यासह इतरांनी महापालिका आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. 
 
यावेळी आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी आरोग्य अधिकारी डॉ.अनिल बोरगे यांना लेखी पत्र देत मृत्यूचे आकडे आंदोलनकर्त्यांना देण्याचे निर्देश दिले. तसेच हे आंदोलन मागे घ्यावे, यासाठी महापौर बाबासाहेब वाकळे आणि मनपा विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी मध्यस्थी केली. जिल्हाधिकारी राहुल त्रिवेदी यांनी महापालिकेमध्ये फोन करून आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. नागरिकांपासून कोणतीही माहिती लपवली जाणार नाही, खरी माहिती दिली जाईल, असे सांगितले त्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
 
वारंवार मागणी करून देखील प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा खरा आकडा दिला जात नसल्यामुळेच हे आंदोलन करण्याची वेळ आली, असे वारे यांनी सांगितले.
 

Post a Comment

Previous Post Next Post