अहमदनगर : १८५ पोलिसांची कोरोनावर मात


एएमसी मिरर वेब टीम

अहमदनगर :  कोरोना काळात बंदोबस्तावर असलेले २४० पोलिस कर्मचारी व अधिकारी बाधित झाले होते व त्यापैकी १८५जण कोरोनामुक्त झाले आहेत. ३०जणांवर उपचार सुरू आहेत व यापैकी एकजणांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. यामध्ये १७ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील ३ पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून, त्यांच्या वारसांना शासनाच्या ५० लाखाच्या विमा संरक्षण योजनेचा लाभ मिळावा म्हणून प्रस्ताव करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

जिल्ह्यात ३२००वर पोलिस कर्मचारी व अधिकारी असून, त्यांच्यात ५५ वर्षे वय पार केलेले सहाशेवर आहेत. त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अन्य कामावर असलेल्यांचीही रोज ऑक्सिजन व अन्य फिटनेस तपासणी होते. कोरोना लक्षणे असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलिस वेल्फेअर फंडातून एक लाखाची वैद्यकीय मदत दिली जाते. त्यातून काहींनी नाशिक व पुणे येथेही उपचार घेतले आहेत. दरम्यान, येत्या दोन दिवसात पोलिसांच्या शासकीय नियमानुसार तसेच विनंती बदल्या करण्यात येणार आहेत. १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या बदल्या यात होणार आहेत, अशी माहितीही पोलिस सूत्रांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post