स्व. अनिलभय्या राठोडांच्या श्रद्धांजली सभेला दीड महिन्यांनी लागला मुहूर्त; रविवारी मुख्यमंत्रीही ऑनलाईन व्यक्त करणार भावना

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर शहरात तब्बल २५ वर्षे आमदारकी केलेले व नगर शहरासह जिल्हा शिवसेनेचे ढाण्या वाघ म्हणून प्रसिद्ध असलेले शिवसेनेचे उपनेते व माजी आमदार (स्व.) अनिलभय्या राठोड यांच्या सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेला अखेर दीड महिन्यांनी मुहूर्त लाभला आहे. रविवारी (२७ सप्टेंबरला) सकाळी ११ वाजता बुरुडगाव रोडवरील नक्षत्र लॉन्समध्ये ही सभा होणार असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या सभेत ऑनलाइन सहभागी होऊन (स्व.) राठोडांविषयी भावना व्यक्त करणार आहेत.

(स्व.) अनिलभय्या राठोड यांचे मागच्या महिन्यात ५ ऑगस्टला निधन झाल्यानंतर शहर शिवसेनेसह विविध संस्थांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर शहर शिवसेनेच्या पुढाकाराने सर्वपक्षीय श्रद्धांजलीचेही नियोजन सुरू होते. पण तिला मुहूर्त लाभत नव्हता. शहर व जिल्ह्यात वाढत्या कोरोनामुळे त्यावेळेस शोकसभा घेण्यात आली नाही. परंतु आता रविवारी (27 सप्टेंब) नक्षत्र लॉन येथे सकाळी 11 ते 2 या वेळेत अगदी मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व नियमांचे पालन करीत शोकसभेचे आयोजन करण्यात आले असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे व शहरप्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले. ही शोकसभा फेसबुकद्वारे लाईव्ह करण्यात येणार आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन शोकसंदेश देणार आहेत. या सभेस राज्यातील व जिल्ह्यातील अनेक मंत्री, आमदार, विविध पक्षांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत. ज्या संस्था, संघटनेच्या पदाधिकार्‍यांना शोकसंदेश पाठवायचे आहेत, त्यांनी एक मिनिटांचा व्हिडिओ शहरप्रमुख दिलीप सातपुते (मो.9922226161), रमेश खेडकर (मो.9822220061), अक्षय नागापुरे (मो.8329520865) यांच्याशी संपर्क साधून पाठवावे. हे शोकसंदेश रविवारी होणार्‍या शोकसभेच्या ठिकाणी दाखविण्यात येणार आहेत. अनिलभैय्यांवर प्रेम करणार्‍या नागरिकांनी घरूनच फेसबुकद्वारे ही शोकसभा पाहण्याचे आवाहन शिवसेनेच्यावतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post