मृताच्या अंगावरील दागिने गायब; पोलिसांनी मागवले सिव्हीलमधून सीसीटीव्ही फुटेज

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मृताच्या अंगावरील दागिने गायब होण्याचा प्रकार जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) घडला आहे. पोलिसात याबाबत तक्रार आल्याने तोफखाना पोलिसांनी सिव्हील हॉस्पिटला पत्र पाठवून हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेज मागवले आहे.


याबाबतची माहिती अशी की, भिंगारजवळील वडारवाडी येथील एकाने याप्रकरणी तोफखाना पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांचे नातलग सिव्हीलमधील आयसीयू वॉर्ड १मध्ये १५ क्रमांकाच्या बेडवर उपचार घेत होते. त्यांचे निधन झाल्यावर त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने कोणीतरी काढून घेतले आहेत, अशी तक्रार त्यांनी पोलिसात दिली आहे. पोलिसांनी या तक्रारीनुसार सिव्हील हॉस्पिटलच्या निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२ ते रात्री ९ या काळातील आयसीयू वॉर्ड १चे सीसीटीव्ही फुटेज देण्याची मागणी केली आहे. या फुटेजच्या आधाराने या दिवशी वॉर्ड क्रमांक १मध्ये नेमके काय घडले तसेच मृत व्यक्तीच्या अंगावरील दागिने कोणी काढून घेतले, याचे स्पष्टीकरण होणार आहे. पोलिसांचा या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post