अहमदनगर : ४० हजारांचा टप्पा ओलांडला; आज ७९० कोरोना बाधितांची भर

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात आज ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६९ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७९० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४३४१ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १४८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२३ आणि अँटीजेन चाचणीत ४१९ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ७०, संगमनेर ०३, पाथर्डी ०४, नगर ग्रामीण ०९, श्रीरामपूर ०२, नेवासा १२, अकोले १७, राहुरी ०१, शेवगाव ०३, कोपरगाव ०६, कर्जत ०५, मिलिटरी हॉस्पिटल १५ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२३ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ७७, संगमनेर १६, राहाता १५, पाथर्डी ०१, नगर ग्रामीण २६, श्रीरामपुर १८, नेवासा १५, श्रीगोंदा ०३, पारनेर १८, अकोले ०२, राहुरी १९, शेवगाव ०२, कोपरगाव ०१, जामखेड ०६ आणि कर्जत ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज ४१९ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १७, संगमनेर ७९, राहाता २७, पाथर्डी ४८, नगर ग्रामीण ०६, श्रीरामपूर २१, कॅंटोन्मेंट ०६, नेवासा ०६, श्रीगोंदा २२, पारनेर १९, अकोले ४१, राहुरी १८, शेवगाव १२, कोपरगाव २८, जामखेड ३० आणि कर्जत ३९ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ८७५ रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा २२२, संगमनेर २४, राहाता ७६, पाथर्डी ५०, नगर ग्रा. ५४, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ८१, श्रीगोंदा ३२, पारनेर ३४, अकोले ४६, राहुरी ४३, शेवगाव ८४, कोपरगाव ३७, जामखेड २४, कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • एकूण रूग्ण संख्या : ४०६५०
  • बरे झालेली रुग्ण संख्या : ३५६४४
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : ४३४१
  • मृत्यू : ६६५
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post