अहमदनगर : आज ५५३ कोरोना बाधितांची रुग्णसंख्येत भर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात आज ५१८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३६ हजार ६७५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५५३ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४६०० इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये १०३, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत १७६ आणि अँटीजेन चाचणीत २७४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४७,
अकोले ०३, जामखेड ०२, कर्जत ०१, नगर ग्रामीण ०९, नेवासा ०१, पाथर्डी ०३, राहुरी ०२, संगमनेर ०१, श्रीगोंदा ११, श्रीरामपूर ०६, मिलिटरी हॉस्पिटल १४ आणि इतर जिल्हा ०३  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या १७६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ५२,अकोले ०१, जामखेड ०४, कर्जत ०४, कोपरगाव ०५, नगर ग्रामीण १७, नेवासा १५, पारनेर ११, पाथर्डी ०३, राहाता १२, राहुरी १३, संगमनेर ०५, शेवगाव ०४, श्रीगोंदा ०५, श्रीरामपूर २३ आणि कॅन्टोन्मेंट ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २७४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा २३, अकोले २८, जामखेड १७, कर्जत २८, कोपरगाव २०, नगर ग्रामीण २०, नेवासा १५, पारनेर ०४, पाथर्डी २२, राहाता २१, राहुरी ०२, संगमनेर ३८, शेवगाव २०, श्रीगोंदा १६ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ५१८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा १०१, अकोले ०३, जामखेड ४४, कर्जत २१,  कोपरगाव ३७, नगर ग्रामीण ४५, नेवासा ४४, पारनेर ३५, पाथर्डी ०६, राहाता २८, राहुरी ३४, संगमनेर ४२, शेवगाव ०३, श्रीगोंदा १३ आणि श्रीरामपूर ६२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

  • एकूण रूग्ण संख्या : ४१९५९
  • बरे झालेली रुग्ण संख्या : ३६६७५
  • उपचार सुरू असलेले रूग्ण : ४६००
  • मृत्यू : ६८४
(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

Post a Comment

Previous Post Next Post