अहमदनगर जिल्ह्यात नव्या 511 कोरोना बाधितांची भर


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 85 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 511 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणार्‍या रुग्णांची संख्या आता 3472 इतकी झाली आहे.

आज जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये 157, अँटीजेन चाचणीत 257 आणि खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत 97 रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या करोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा 41, संगमनेर 01, राहाता 01, पाथर्डी 11, नगर ग्रामीण 06, श्रीरामपूर 02, कँटोन्मेंट 01, नेवासा 06, श्रीगोंदा 03, पारनेर 03, अकोले 17, शेवगाव 51, कोपरगाव 01, जामखेड 02, कर्जत 01 आणि मिलिटरी हॉस्पिटल 10 अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज 257 जण बाधित आढळुन आले. यामध्ये मनपा 68, राहाता 14, नगर ग्रामीण 24, श्रीगोंदा 18, पारनेर 17, अकोले 05, राहुरी 15, शेवगाव 23, कोपरगाव 35, जामखेड 17 आणि कर्जत 21 अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या 97 रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा 32, संगमनेर 20, राहाता 05, नगर ग्रामीण 06, श्रीरामपुर 18, नेवासा 03, श्रीगोंदा 01, पारनेर 02, अकोले 04, राहुरी 01, शेवगाव 01, कोपरगांव 03, जामखेड 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज 638 रुग्णांना बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 205 संगमनेर 42 राहाता 32, पाथर्डी 12, नगर ग्रामीण 42, श्रीरामपूर 43, कँटोन्मेंट 10, नेवासा 53, श्रीगोंदा 19, पारनेर 12, अकोले 13, राहुरी 21, शेवगाव 38, कोपरगाव 53, जामखेड 08, कर्जत 15, मिलिटरी हॉस्पिटल 18 आणि इतर जिल्हा 02 अशा रुग्णांचा समावेश आहे.

Post a Comment

Previous Post Next Post