मनपा स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त सापडला; 1 ऑक्टोबरला सभा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीनंतर आता महापालिकेच्या स्वीकृत सदस्य निवडीला मुहूर्त मिळाला आहे. येत्या 1 ऑक्टोबरला सदस्य निवडीसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ऑनलाईन पध्दतीनेच सभा होणार आहे.

मागील सभेत तत्कालीन प्रभारी आयुक्तांकडून एकाचीही शिफारस न झाल्याने सदस्य निवड रखडली होती. आता पुन्हा सभा काढण्यात आली आहे. मात्र, मागील वेळेस राबविण्यात आलेली आयुक्तांकडे नावे व कागदपत्रे सादर करण्याची पध्दत यावेळी राबविणार का, याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही.

दरम्यान स्वीकृत सदस्य निवडीत शिवसेना 2, राष्ट्रवादी 2 व भाजपचा 1 सदस्य असे 5 सदस्य निवडले जाणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post