अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी 25 सप्टेंबरला निवडणूक


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी येत्या 25 सप्टेंबला निवडणूक होणार आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

स्थायी समितीच्या रिक्त असलेल्या जागांवर नवीन सदस्यांची निवड करण्यात आली होती. मात्र, शासनाच्या निर्देशानुसार सभापती निवडणूक रखडली होती. काही दिवसांपूर्वीच शासनाने व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे निवडणुका घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार विभागीय आयुक्तांकडून 25 सप्टेंबरला सकाळी ११ वाजता निवडणूक जाहीर करण्यात आली आहे. पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून, त्यांच्याकडूनच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार आहे. निवडणुकीसाठी व्हिडिओ कॉन्फ़रन्सिंगची व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

दरम्यान, निवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post