अहमदनगर : सभापती निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर; 21 पासून अर्ज भरण्यास सुरुवात


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी निवडणूक कार्यक्रम पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जाहीर केला आहे. 21 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातून ऑनलाईन प्रक्रियेद्वारे निवडणूकीची प्रक्रिया पार पडणार आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास मतदान प्रक्रीयाही ऑनलाईन पध्दतीने होणार आहे. अर्ज माघारीची प्रक्रीयाही ऑनलाईनच होणार असल्याचे नगर सचिव एस. बी. तडवी यांनी सांगितले.

असा आहे निवडणूक कार्यक्रम:

  • उमेदवारी अर्ज वितरण व दाखल करणे : 
  • 21 ते 24 सप्टेंबर 2020
  • वेळ : सकाळी 11 ते 1.30 वाजेपर्यंत
  • स्थळ : नगरसचिव कार्यालय
  • 25 सप्टेंबर रोजी निवडणूक विशेष सभा
  • सकाळी 11 वाजता : सभा सुरु झाल्यानंतर प्राप्त पीठासीन अधिकारी यांच्याकडे सादर होणार 
  • सकाळी 11.10 वाजता : उमेदवारी अर्जांची छाननी
  • छाननीनंतर अर्ज माघारीसाठी 15 मिनिटे मुदत 
  • छाननीनंतर वैध उमेदवारांची नावे जाहीर करणे
  • एकापेक्षा जास्त उमेदवार शिल्लक राहिल्यास ऑनलाईन मतदान प्रक्रीया पार पाडणे 

Post a Comment

Previous Post Next Post