वीजपुरवठा खंडीत; नगर शहरात आज पाणी नाही


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : शहर पाणी पुरवठा योजनेचा वीजपुरवठा बुधवारी (दि.2) खंडीत झाल्यामुळे शहर वितरण व्यवस्थेच्या पाण्याच्या टाक्या निर्धारित वेळेत भरणे शक्य झाले नाही.
त्यामुळे आज (दि.3) शहर पाणी वाटपाच्या मध्यवर्ती भागास पाणीपुरवठा होणार नसल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

आज (दि.3) रोजी सिद्धार्थनगर, लालटाकी, दिल्लीगेट, चितळे रोड, तोफखाना, नालेगांव, कापड बाजार, आनंदी बाजार या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. उद्या (दि.4) नेहमीच्या वेळेत या भागात पाणी पुरवठा करण्यात येईल. तसेच उद्या (शुक्रवारी) रोटेशननुसार पाणी वाटप असलेल्या शहराच्या मध्यवर्ती भागातील झेंडीगेट, रामचंद्र खुंट, हातमपुरा, कोठला, माळीवाडा या भागाचा पाणीपुरवठा बंद राहणार असून, या भागास शनिवारी (दि.5) पाणीपुरवठा करण्यात येईल, असे मनापाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post