अहमदनगर : सावेडी उपनगरातील अपार्टमेंटमध्ये दुचाकी पेटविल्या?


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : सावेडी उपनगरातील वसंत टेकडी भागातील शिलाविहार अपार्टमेंट परिसरात पार्क केलेल्या दुचाकींना मध्यरात्री ३ वाजण्याच्या सुमारास आग लागली. सदर गाड्या पेटविण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.

आगीत १ दुचाकी भस्मसात तर ३ दुचाक्यांचे अंशतः नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाचे वाहन दाखल होईपर्यंत स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणली होती. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र, या ठिकाणी शॉर्टसर्किटची शक्यता कमी असून वाहने पेटविण्यात आल्याचा संशय माजी नगरसेवक निखील वारे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post