लॉकडाऊन नाहीच, जनता कर्फ्युचे तुम्हीच ठरवा; पालकमंत्र्यांनी महापौर व आमदारांवर ढकलली जबाबदारी


 
एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
केंद्र सरकारने मनाई केल्याने आता नगरच काय, पण कोठेही लोकडाऊन केले जाणार नाही. तुम्हाला नगरमध्ये गरज वाटत असेल तर तुम्ही जनता कर्फ्यू्चा निर्णय घ्या, असे म्हणत पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार संग्राम जगताप व महापौर बाबासाहेब वाकळे यांच्यावर जबाबदारी ढकलली.  

जनता कर्फ्यू जाहीर केल्यावर आधी 2 दिवस व कर्फ्यु संपल्यावर पुढेचे 3-4 दिवस बाजारात गर्दी उसळते व जनता कर्फ्यूचा काहीही फायदा होत नाही, असा माझा कोल्हापूर व कागलचा अनुभव आहे, असे वास्तवही त्यांनी मांडले. 

मुश्रीफ म्हणाले की, माझे कुटुंब.. मोहिमेत 25 टक्के कोविड रुग्ण वाढ होऊ शकते. त्यासाठी साडेसहा हजार बेड तयार ठेवले आहेत. 25 ऑक्टोबर रोजी विजया दशमीला कोविड रावणाचा अंत यातून होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

के के रेंज भूसंपादन होणार असल्याचे माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनीच आपल्याला सांगितले असल्याचे सांगत मुश्रीफ म्हणाले, के के रेंजबाबत जिल्ह्याची जी भूमिका आहे, तीच माझी असेल. पूढील आठवड्यात याबाबत बैठक घेणार आहे.

तर, मेसमा लावू..
खासगी डॉक्टर काम बंद करू शकत नाहीत. त्यांच्याविरुद्ध अत्यावश्यक सेवा कायदा-मेस्मा लागू केला जाईल, असा इशारा मुश्रीफ यांनी दिला. तालुक्यात नगर पालिका व अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांनी हॉल उपलब्ध करून दिल्यास त्या तालुक्यातील खासगी डॉक्टर एकत्र येऊन तेथे कोविड सेंटर सुरू करू शकतील, असे ते म्हणाले.

विखे सिनियर.. मी ज्युनियर .. 
आमदार राधाकृष्ण विखे यांना मी मीटिंगला बोलावतो. पण ते येत नाहीत. बहुदा ते सिनियर त मी ज्युनियर असल्याने ते येत नसावेत. मला त्यांच्या सल्ल्याची नेहमी गरज असते, असा उपरोधिक टोला मुश्रीफ यांनी विखेंना लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post