पोलिसांनी उधळला 'तिरट'चा रंगलेला डाव, 41 जणांविरुद्ध गुन्हा


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
मंडळी पत्त्यांच्या डावात मग्न झाली होती...५ ठिकाणी कोंडाळे करून सारे बसले होते...पॅक-ब्लाईंड-पत्ते दाखव...सारखी परवलीची वाक्ये व संवाद झडत असावेत....अचानक पोलिसांचा छापा पडला आणि रंगलेला तिरटचा डाव उदध्वस्त झाला. राहाता तालुक्यातील कोल्हार बुद्रुक येथे सुरू असलेला जुगाराचा अड्डा पोलिसांनी छापा घालून नेस्तनाबूत केला. येथून तब्बल ४१ लोकांना ताब्यात घेताना त्यांच्याकडून ८ लाखावर रोख रक्कम तसेच ३२जणांचे मोबाईल व ९ वाहने मिळून एकूण ४४ लाखाचा मुद्देमाल जप्त केला गेला.

या सर्वाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ४१ आरोपींविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस नाईक शंकर चौधरी यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून लोणी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील कार्यवाही लोणी पोलिस करीत आहेत.

'त्यांना' मिळाली खबर...'त्यांनी' केली खात्री
पोलिस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांना या जुगार अड्ड्याची खबर १३ सप्टेंबरला मिळाली होती. गुप्त बातमीदाराकडून त्यांना मिळालेल्या माहितीनुसार कोल्हार बुद्रूक (ता.राहाता) येथे कोल्हार ते लोणी जाणाऱ्या रोडच्या कडेला मुदस्सर शकील शेख (रा . कोल्हार बुद्रूक, ता- राहाता) हा कय्युम करीम शेख याच्या इमारतीचे टेरेसवर २५ ते ३० लोकांना एकत्र जमवून तिरट नावाचा हारजितीचा जुगार खेळत व खेळवीत आहे. आता गेल्यास तेथे सर्वजण सापडतील अशी माहिती मिळाल्याने त्यांनी ही माहिती परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक अभिनव त्यागी, परीविक्षाधिन सहायक पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना कळवून कारवाईचे आदेश दिले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक गणेश इंगळे, हेड कॉन्स्टेबल विष्णू घोडेचोर, विजयकुमार वेठेकर, दत्तात्रय गव्हाणे, पोलिस नाईक शंकर चौधरी, विश्वास बेरड, विजय ठोंबरे, विशाल दळवी, कॉन्स्टेबल राहुल सोळंके, संदीप दरंदले, मच्छिन्द्र बर्डे, सागर सुलाने, योगेश सातपुते, चालक हे़ड कॉन्स्टेबल संभाजी कोतकर, देवीदास काळे यांनी पथके तयार करून कारवाईसाठी कूच केले. कोल्हार पोलीस दूरक्षेत्राजवळ सर्वांनी स्वतःची वाहने उभी केली व मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी दोन पंचासह पायी जावून खात्री केली. त्यावेळी त्यांना कय्यूम करीम शेख याच्या इमारतीच्या टेरेसवर ३५ ते ४० जण पाच वेगवेगळ्या ठिकाणी गोलाकार बसून हातामध्ये पत्ते घेवून तिरट जुगार खेळत असताना दिसले. त्यानंतर पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना खात्री झाल्याने रात्री ८ वा. अचानक छापा टाकून जुगार खेळत असलेल्यांना ताब्यात घेतले. पथकातील अधिकाऱ्यांनी त्यांना पोलीस स्टाफ व पंचांची ओळख सांगून त्यांना त्यांची नावे, पत्ते विचारले व त्यांची झडतीही घेतली. पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यामध्ये व त्यांच्या कब्जामध्ये ८,१९,१४० रुपये (आठ लाख एकोणवीस हजार एकशे चाळीस रुपये) रोख रक्कम तसेच २ लाख ६६ हजार ६५० रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे ३२ मोबाईल आणि ३३ लाख रुपये किमतीची ७ चारचाकी वाहने व ३२ हजार रुपये किमतीच्या दोन मोटार सायकली तसेच तिरट जुगाराची साधने असा एकूण ४४ लाख १७ हजार ७९० रुपये किमतीचा मुद्देमाल सापडला. तो जप्त करण्यात आला आहे.

तरुणांपासून वयस्कांपर्यंत आरोपी, जिल्ह्यातील व बाहेरीलही शौकिन
जुगार खेळताना पकडलेल्या आरोपींमध्ये जिल्हाभरातील व जिल्ह्याबाहेरीलही शौकिनांचा समावेश आहे. यात गुन्हा दाखल झालेले आरोपी असे- १ ) चेतन वाघमारे (वय -२३ वर्षे , रा . पिंपळस , ता- राहाता) २ ) मुदस्सर शेख , (वय- ४१ वर्षे , रा . कोल्हार बुा , ता- राहाता) ३ ) अश्पाक शेख , (वय -४३ वर्षे , रा . मनमाड , ता - नांदगांव , जि- नाशिक), ४ ) सागर बेदाडे , (वय -३२ वर्षे , रा . मनमाड , ता नांदगांव), ५ ) दिलावर शेख , (वय -२१ वर्षे , रा . कोल्हार बुाा , ता- राहाता), ६ ) अरबाज पठाण , (वय १ ९ वर्षे , रा . राहाता , ता- राहाता), ७ ) माहीद शेख , (वय- १ ९ वर्षे , रा . कोल्हार बुा , ता- राहाता), ८ ) जुबेरखान पठाण , (वय -३७ वर्षे , नाईकवाडपुरा , संगमनेर) , ९ ) असीफ शेख , (वय -३५ वर्षे , रा . कोल्हार बुा , ता- राहाता), १० ) अर्शद मोमीन , (वय- २५ वर्षे , रा . येवला , जि - नाशिक), ११ ) वसंत वडे , (वय -६० वर्षे , रा . येवला , जि- नाशिक), १२ ) अमित गाडेकर , (वय -३२ वर्षे , रा . राहाता), १३ ) लालू चौधरी , (वय- ३५ वर्षे , रा . अकोले , जि- अ.नगर), १४ ) कय्युम पठाण , (वय- ४७ वर्षे , रा . विसापूर , ता- श्रीगोंदा) , १५ ) नवाब शेख , (वय- ४९ वर्षे , रा . लोणी , ता- राहाता), १६ ) जाहीद सय्यद , (वय -१ ९ वर्षे , रा . अंबिकानगर , कोल्हार बुाा , ता- राहाता), १७ ) सय्यद मोहमंद , (वय -६० वर्षे , रा . वांबोरी , ता- राहूरी), १८ ) सतीश वैष्णव , (वय- ४१ वर्षे , रा . अकोले , जि- अ.नगर), १ ९ ) रवींद्र चकोर , (वय -३३ वर्षे , रा . माधवनगर , मनमाड , जि- नाशिक), २० ) मुनावर शेख , (वय -३० वर्षे , रा . वांबोरी , ता - राहूरी), २१ ) दीपक उंबरे , (वय- ४२ वर्षे , रा . येवला , जि - नाशिक), २२ ) परवेज शेख , (वय -३८ वर्षे , रा . मनमाड , ता- नांदगांव , जि- नाशिक), २३ ) अब्बास शेख , (वय- २१ वर्षे , रा मनमाड , ता- नांदगाव , जि- नाशिक), २४ ) चाँद शेख , (वय- २९ वर्षे , रा . कोल्हार बुाा , ता- राहाता,) २५ ) जयहिंद माळी, (वय- ४७ वर्षे , रा . राहुरी बुा , ता- राहूरी), २६ ) विलास चोथे , (वय- ४३ वर्षे , रा . वांबोरी , ता- राहूरी), २७ ) सागर वर्मा , (वय -३८ वर्षे , रा . बेलापूर बा , ता- श्रीरामपूर), २८ ) गणेश जेजूरकर , (वय -३४ वर्षे , रा . शिर्डी, ता- राहाता), २९ ) इम्रान मोमीन , (वय -३६ वर्षे , रा . मनमाड , ता- नांदगांव , जि - नाशिक), ३० ) शकील शेख , (वय- २९ वर्षे , रा . अंबीकानगर , कोल्हार बुाा , ता- राहाता) , ३१ ) नजीर शेख , (वय- ४२ वर्षे , रा . राहूरी बुाा , ता- राहाता), ३२ ) संतोष चौधरी , (वय- ४० वर्षे , रा . अकोले , जि- अ.नगर), ३३ ) शकील शेख , (वय -६२ वर्षे , रा . कोल्हार बुा , ता- राहाता), ३४ ) संजय पटेल , (वय -३५ वर्षे , वय- कोल्हार , ता- राहाता) , ३५ ) नुमान शेख , (वय- २० वर्षे , रा . कोल्हार बु , ता- राहाता), ३६ ) संकलेन शेख , (वय- २४ वर्षे , रा . कोल्हार बुाा , ता- राहाता), ३७ ) भाऊसाहेब चौधरी , (वय -३१ वर्षे , रा . रुई , ता- राहाता), ३८ ) सचिन पवार , (वय- ४० वर्षे , रा . कोल्हार बुा , ता- राहाता), ३ ९ ) अमोल वाघमारे , (वय -३७ वर्षे , रा . विसापूर , ता- श्रीगोंदा), ४० ) गणेश सोमासे , (वय- २९ वर्षे , रा . येवला , जि- नाशिक), ४१ ) महेश बुरकूल , (वय -३१ वर्षे , रा . मनमाड , ता- नांदगाव , जि - नाशिक).

Post a Comment

Previous Post Next Post