अहमदनगर : कंगनाच्या चित्रपट प्रदर्शनाला जिल्ह्यातील 'या' तालुक्यात बंदी!


एएमसी मिरर वेब टीम
कोपरगाव :
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल चित्रपट अभिनेत्री कंगना रानावत हिचा एकही चित्रपट यापुढे कोपरगाव शहरात प्रदर्शित होऊ दिला जाणार नाही, अशी भूमिका कोपरगाव शिवसेनेने घेतली आहे.

जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे म्हणाले की, देशद्रोही कंगना रानावत आपल्या मुंबई मध्ये येऊन सुपरस्टार बनली, स्वत:च स्वप्न साकार केलं आणि आता तिनेच आपल्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरबरोबर केली.

तसेच शिवसैनिकांचे दैवत पक्ष प्रमुख व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एकेरी भाषेत बोलली आहे व ह्याच विकृत,उन्मत्त बाईने महाराष्ट्र सरकारला बाबरच्या नावाने संबोधित करून आपल्या महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा अवमान करण्याचे धाडस केले आहे.

झाशीच्या राणीची भूमिका केल्यामुळे ती स्वत:ला महान झाशीची राणी समजायला लागली आहे. कुठे ती थोर वीरांगना झाशीची राणी आणि कुठे ही वाटांगण कंगणा. स्त्री असो किंवा पुरुष महाराष्ट्राचा अवमान करणार्‍याला शिक्षा ही झालीच पाहिजे.

शहरप्रमुख कलविंदर दडीयाल म्हणाले की, ज्या कर्मभूमीमध्ये ही देशद्रोही सुपरस्टार बनली आज त्याच भूमीचा हिने अवमान केला आहे. त्यामुळे हिचा एकही चित्रपट प्रदर्शित न करण्याचे आवाहन केले आहे.

महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे म्हणाल्या, कोपरगावसह संपूर्ण महाराष्ट्रात ह्या देशद्रोही कंगनाचा चित्रपट प्रदर्शित करू नये नाहीतर शिवसेना स्टाईलने आंदोलन करू.

महिला आघाडी जिल्हाप्रमुख सपना मोरे, नगरसेविका वर्षा शिंगाडे, युवासेना सहसचिव व विस्तारक शिर्डी लोकसभा सुनील तिवारी, एस टी कामगार सेना प्रमुख भरत मोरे, विधानसभा संघटक अस्लम शेख, शहरप्रमुख कलविंदरसिंग दडीयाल, उपशहरप्रमुख प्रफुल्ल शिंगाडे, विभागप्रमुख विकास शर्मा, शहर संघटक बाळासाहेब साळुंके, इरफान शेख, व्यापारी सेनेचे योगेश मोरे, अभिषेक आव्हाड, वैभव लोणारी, अनिकेत कुर्‍हे, अक्षय नन्नवरे, अक्षय वाकचौरे, भूषण पाटणकर, मयुर खरनार, आकाश कानडे, वाल्मीक चिने, निशांत झावरे, विजय सोनवणे, गगन हाडा, वासिम शेख, श्रीपाद भसाळे, मयुर शिवदे, सनी डहांके, विजय शिंदे, सचिन मोरे, भूषण वडांगळे, प्रवीण देशमुख आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post