जनता कर्फ्युबाबत आ.संग्राम जगताप, महापौर वाकळे यांनी मांडली भूमिका


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी नगरमध्ये करोना आढावा बैठक घेतली. या बैठकीत नगर शहरातील लॉकडाऊनबाबत त्यांनी प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींची मते जाणून घेतली. सरकारच्या धोरणानुसार लॉकडाऊन लावता येत नसल्याचे स्पष्ट करीत त्यांनी जनता कर्फ्युचा पर्याय अवलंबण्याचे आवाहन केले. जनता कर्फ्युबाबत आ.संग्राम जगताप यांनीही भूमिका मांडली असून व्यापारी, व्यावसायिक, उपनगरातील नागरिक, सर्व पक्षीयांची मते विचारात घेवूनच अंतिम निर्णय घ्यावा लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. जनता कर्फ्युबाबत माझ्या वैयक्तिक मतापेक्षाही सर्वांचे एकमत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

दुसरीकडे महापौर बाबासाहेब वाकळे यांनी वैयक्तिक स्तरावर जनता कर्फ्युची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. परंतु, हा निर्णय सर्वसहमतीनेच घ्यावा लागणार असल्याचे सांगत महापौरांनी दोन तीन दिवसांत संबंधितांशी चर्चा करून निर्णय घेण्याचे जाहीर केले.

Post a Comment

Previous Post Next Post