रिक्षा व्यावसायिकांना शासनाकडून आर्थिक मदत मिळावी : आ. संग्राम जगताप


 
एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : कोरोना संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव भारतामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू झाल्यावर देशामध्ये कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांवर आर्थिक संकट आल्यामुळे बेरोजगारीची वेळ आली. तसेच शहरामध्ये आता मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग पसरत असल्यामुळे नागरिक रिक्षामध्ये बसण्यास घाबरत आहेत. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी विशेष आर्थिक मदत करावी, अशी मागणी शासन दरबारी केली आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.
 
कोरोना आजार हा संसर्गित असल्या कारणाने नगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढला आहे .त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना हा संसर्ग विषाणू असल्याकारणाने नागरिकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे आहे.  प्रत्येक नागरिकाने कोरोना आजाराला न घाबरता सुरक्षित अंतर ठेवून व मास्कचा वापर करून स्वच्छता राखावी, तसेच शासनाने घातलेल्या अटी शर्तीचे व नियमांचे पालन प्रत्येक नागरिकांनी करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. 

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस चे शहरजिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे व राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहर सचिव तन्वीर मणियार यांच्या वतीने स्वरक्षण किट व मास्कचे वाटप  करताना राष्ट्रवादी आमदार संग्राम जगताप, युवक अध्यक्ष अभिजित खोसे, संतोष ढाकणे, सज्जाद बागवान, सनी साठे, सतीश शिरसाठ आदीसह रिक्षाचालक पदाधिकारी चालक उपस्थित होते.
 
वैभव ढाकणे म्हणाले की, कोरोना संसर्ग विषाणूचा नायनाट करण्यासाठी नागरिकांच्या सहकार्याची गरज आहे .जगताप कुटुंब नेहमीच शहरावर आलेल्या संकटाच्या काळामध्ये  नागरिकांना आधार देण्यासाठी उभे असते, आ. संग्राम जगताप यांनी लॉक डाऊन च्या काळामध्ये सर्व व्यवसाय काम धंदा बंद असल्यामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले होते या संकटाच्या काळामध्ये  गरजूंना  अन्न धान्य वाटप असेल की हॉस्पिटल मध्ये मदत पुरवण्याचे काम त्यांनी केले आहे, असे म्हणाले.
 
तन्वीर मणियार म्हणाले की, आ.संग्राम जगताप यांच्या प्रेरणेतून आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम करत असतो . कोरोना संकटाच्या काळामध्ये नागरिकांच्या व रिक्षाचालक यांच्या आरोग्यासाठी या स्वरक्षण किट चे वाटप करत आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post