एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : कल्याण रोड ते नगर- पुणे हायवे रोड जोडणाऱ्या लिंकरोड वरील पुलाचे काम सुरू असून शेजारी केलेला तात्पुरता फुल हा पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच या रोडवर मोठ्या प्रमाणात अपघातही होत आहेत. त्यामुळे या पुलाचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश बांधकाम विभागाचे उपअभियंता अशोक भोसले यांना दिले. तसेच या पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत दोन्ही साईड ने हा रस्ता बंद करून त्या ठिकाणी रस्ता बंदचे फलक लावावे, ज्याने करून कुठलाही अपघात होणार नाही, अशा सूचना आमदार संग्राम जगताप यांनी दिल्या. आमदार जगताप यांनी पाहणी करून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.
नगर शहरातून राज्य व राष्ट्रीय महामार्ग जात असून ते पावसामुळे अत्यंत खराब झाले आहेत रस्त्यावर पावसाच्या पाण्यामुळे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे नागरिकांना वाट काढणे कठीण झाले आहे अनेक जणांचे या खड्ड्यामुळे छोटे-मोठे अपघातही झाले आहेत. महामार्गावरील खड्ड्यांच्या या साम्राज्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे एखाद्या नागरिकाचा जीवही जाऊ शकतो. नेप्ती नाका ते रेल्वे उड्डाण फुल कल्याण रोड पर्यंतची रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून नागरिकांना त्याचा खूप त्रास होत आहे. यासाठी तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवण्याचे आदेश दिले आहेत. पावसाळा उघडल्यानंतर सर्व राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार जगताप यांनी यावेळी दिली.
यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष वैभव ढाकणे, संभाजी पवार, शाखा उप अभियंता बापूसाहेब वराळे, वैभव वाघ, भूषण गुंड, सोनू जगताप, सागर भांबरे, संतोष शेटे, आदिल खान, अरबाज खान, विकी गायके, संतोष जगताप, तुषार हंगे उपस्थित होते .
Post a Comment