रावसाहेब पटवर्धन पतसंस्था आर्थिक फसवणूक प्रकरण;पंतप्रधान कार्यालयाकडून तक्रारीची दखल


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : रावसाहेब पटवर्धन नागरी सहकारी पतसंस्थेविरूध्द दाखल आर्थिक फसवणूक प्रकरणाची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल घेण्यात आली आहे. यासंदर्भात इस्माईल गुलाब शेख यंानी वकिलांमार्फत पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली होती. पंतप्रधान कार्यालयाकडून चौकशीचे पत्र जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय व संबंधित वकिल महेश आनंदास यांना प्राप्त झाले आहे.

याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक, तालुका उपनिबंधक, रावसाहेब पटवर्धन पतसंस्था संचालक आदी 29 जणांविरूध्द गुन्हा दाखल झालेला आहे. महिन्याचा कालावधी उलटूनही आर्थिक गुन्हे शाखेकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. चौकशीत होत असलेल्या दिरंगाईमुळे सदर आर्थिक गुन्हा सीआयडीकडे सोपविण्यात यावा, अशी मागणी केली आहे. याबाबत कारवाई करण्यास दिरंगाई होत असल्याने ठेवीदारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. बहुतांशी ठेवीदार ज्येष्ठ नागरिक आहेत. लॉकडाऊनमध्ये या ठेवीदारांचे पैसे अडकून पडल्याने त्यांचे हाल झाले. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी याबाबत दखल घेऊन कारवाई करावी. संचालकांच्या मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवीची रक्कम वसूल करून ठेवीदारांना न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post