अभिनेत्री कंगना विरोधात कारवाई करा; नगर शिवसेनेची मागणी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : अभिनेत्री कंगना राणावतने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात एकेरी भाषेत टीका केल्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कंगणा विरोधात ठिकठिकाणी निषेध नोंदविण्यात येत असून नगर शहरात शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांच्यासह शिवसेना नगरसेवक व पदाधिकार्यांनी निषेध करत कोतवाली पोलिसात निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.

शिवसेनेचे नगरसेवक गणेश कवडे, श्याम नळकांडे, दत्ता कावरे, प्रशांत गायकवाड, सचिन शिंदे, योगीराज गाडे, संजय शेंडगे, बबलू शिंदे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा आशा निंबाळकर, सुषमा पडोळे, शहराध्यक्ष अरुणा गोयल, भिंगार शहराध्यक्ष सुनील लालबोंद्रे, रमेश परतानी यांच्यासह कार्यकर्त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांची भेट घेऊन कंगना राणावत विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. कंगनाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या बाबत एकेरी उल्लेख व आक्षेपार्ह टिपण्णी करून त्यांचा व राज्यातील शिवसैनिक व जनतेचा अपमान केल्याचे निवेदनात म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post