ऑक्सिजन सुविधेचे बेड वाढवा; शिवसेना शिष्टमंडळाची जिल्हा शल्य चिकित्सकांशी चर्चा

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही वाढत आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना ऑक्सिजन सुविधेची गरज पडत आहे. जिल्हा रुग्णालयात तातडीने 300 ऑक्सिजन सुविधा असलेले बेड उपलब्ध करावेत. त्यासाठी शिवसेनेमार्फत शासन दरबारी पाठपुरावा करून सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन शिवसेना शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी केले.


शिवसेना पदाधिकारी व नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, विजय पठारे, शाम नळकांडे, अक्षय उनवणे, उपजिल्हा प्रमुख गिरीश जाधव, आनंद लहामगे, दत्ता जाधव, विशाल वालकर, संतोष गेणाप्पा, काका शेळके, अभिषेक भोसले, परेश लोखंडे आदी उपस्थित होते.


जिल्हा रुग्णालयात उपलब्ध बेडची सुविधा, कोरोना रुग्णांना दिल्या जाणार्‍या सुविधा, यंत्रसामुग्री, आवश्यक असलेली सामग्री, सेवा देताना येणार्‍या अडचणी, रुग्णांच्या व नातेवाईकांच्या तक्रारी आदींबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. काही विषयांबाबत अपुर्‍या माहितीमुळे रुग्णालयाबाबत गैरसमज होत असल्याची माहिती डॉ.पोखरणा यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post