काळजी करू नका.. अनिलभैय्यांची शिवसेना तुमच्या पाठिशी आहे; सेनेने भाजी विक्रेत्यांना दिला धीर


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : प्रोफेसर चौक येथे भाजी विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी मनाई करण्यात आली होती. याबाबत विक्रेत्यांनी शिवसेनेकडे धाव घेतली. शिवसेनेने अडचणीबाबत चर्चा करून भाजी विक्रेत्यांना पुन्हा व्यवसाय सुरू करून दिले. काळजी करू नका. अनिलभैय्यांची शिवसेना तुमच्या पाठिशी कायम आहे. कोणत्याही परिस्थितीत तुमच्यावर अन्याय होवू देणार नाही, अशी ग्वाही शिवसेनेकडून देण्यात आली.

यावेळी शहर प्रमुख दिलीप सातपुते, माजी महापौर अभिषेक कळमकर, गिरीश जाधव, नगरसेवक योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, अक्षय कातोरे, काका शेळके, उषाताई ओझा, पराग गुंड, परेश लोखंडे आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

गेल्या तीन दिवसांपासून प्रोफेसर चौक येथील भाजी विक्रेत्यांना भाजी विक्रीसाठी मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनाच्या संकटात काळात गरीब भाजी विक्रेते कसेबसे आपले पोट भरत आहेत. गुरुवारी शिवसेनेने सर्व अडचणी दूर करून पुन्हा या चौकामध्ये भाजी विक्रेत्यांना आपला व्यवसाय करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. सर्वांनी समंजसपणाने कोणाशीही वाद न घालता या ठिकाणी व्यवसाय करावा आणि इतरांनी सहकार्य करावे. शिवसेना भाजी विक्रेत्यांच्या पाठीशी आहे, असे शहर प्रमुख दिलीप सातपुते यांनी सांगितले.

माजी महापौर अभिषेक कळमकर म्हणाले, भाजी विक्रेते हे सर्व सामान्य घरातील आहेत. कसेबसे भाजी विक्री करून आपले घर चालवतात. त्यांना याशिवाय दुसरे कोणतेही उत्पन्नाचे साधन नाही. त्यामुळे इतर लोकांनीही समजून घ्यावे. भाजीविक्रेत्यामुळे कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. शिवसेना सर्वसामान्यांच्या पाठीशी, आणि सर्वसामान्य माणूस कायम शिवसेनेच्या पाठीशी उभा राहिला आहे. स्व. अनिलभैया राठोड यांनीही कायम सर्वसामान्यांच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून दिला आहे. त्यांच्या विचारानुसार व् शिकवणीनुसारच आम्ही काम करत आहोत. सर्वसामान्यांच्या पाठीशी आम्ही कायम उभे आहोत, असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post