शुध्दीवर नसल्याने जाधव यांना भाजपच्या कार्याची माहिती नाही : अनिल गट्टाणी


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : मार्च महिन्यात लॉकडाऊनमध्ये फुटपाथवरील बेघर, भिकारी, गरजूंना सर्वात प्रथम भाजपने व महापौर, शहर जिल्हाध्यक्ष, सर्व पदाधिकारी, नगरसेवकांनी अन्नदान केले. विविध ठिकाणी भाजपाच्या माध्यमातून गरजूंना धान्यवाटप केले. शिवसेनेचे गिरीश जाधव शुध्दीवर नसतात. त्यामुळे या कार्याची त्यांना माहिती नाही, अशा शब्दांत भाजपच्या अनिल गट्टाणी यांनी शिवसेना उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.

गट्टाणी यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले की, पालिकेच्या वतीने महापौरांसह सर्व पदाधिकारी व नगरसेवकांच्या संकल्पनेतून संजोग लॉन, जाधव लॉन येथे कम्युनिटी किचन सुरू झाले. या माध्यमातून दोन हजार गरजूंच्या भोजनाची व्यवस्था झाली. शुध्द हरपलेल्या जाधव यांना हे काम दिसले नाही. महापालिकेच्या वतीने कोविड रुग्णांसाठी मोफत सेंटर सुरू केले. याचा सर्व सामान्य रुग्णांना फायदा झाला. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण देखील वाढले. नटराज हॉटेल येथे कोविड सेंटर सुरु करण्यासाठी संबंधीत मालक यांच्याशी वेळोवेळी चर्चा करून त्या ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु करण्यात आले. संबंधित जागा मालकांनी कोविडच्या कामासाठी ही जागा मोफत उपलब्ध करून दिली. याची माहितीही जाधव यांना नसल्याचे दिसून येते.

महापौरांवर टिका करण्यापूर्वी आपण कोणत्या ठिकाणी कोविड सेंटर सुरु करण्याचे प्रयत्न केले? रुग्णांवर मोफत उपचाराकरिता काय मदत केली? याचे उत्तर द्यावे. फक्त प्रसिध्दीसाठी पत्रक काढणे आता बंद करावे. कायम पत्रक बाजीचेच काम करणार्‍या जाधव यांचा यामागचा हेतू काय असतो, हे नगरकरांना कळले आहे. स्वत: काही करायच नाही. पण जे काम करत आहेत, त्यामध्ये आडकाठी आणण्याचे काम जाधव करत आहेत. त्यांनी पत्रकबाजी करण्यापेक्षा शहरातील रूग्णांसाठी नव्याने स्वतंत्र कोविड सेंटर सुरू करावे, असा सल्लाही गट्टाणी यांनी जाधव यांना दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post