शिववरद प्रतिष्ठानच्या सुसज्ज दवाखान्याचे ९ सप्टेंबरला लोकार्पण


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या प्रयत्नातून शिववरद प्रतिष्ठानच्या मार्फत गेल्या तीन वर्षापासून थोर स्वात्यंत्रसैनिक स्व.मोहनराव दारवेकर यांच्या स्मरणार्थ मोफत दवाखाना सुरु केला आहे. आताच्या परिस्थितीत मोठ्याप्रमाणात सर्व आजारांच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने या छोट्या दवाखान्याचे स्वरूप वाढवून नव्या प्रशस्त जागेत स्थलांतरित करून रुग्णांना अत्याधुनिक आरोग्य सुविधा देणार आहोत. माजी नगरसेवक किशोर डागवाले यांच्या वाढदिवसानिमित्त कोणताही कार्यक्रम न करता येत्या ९ सप्टेंबरला या दवाखान्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे, अशी माहिती शिववरद प्रतिष्ठानचे अध्यक्ष नितीन डागवाले यांनी दिली.

सागर गोरे म्हणाले, या दवाखान्याच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी विविध आजारांवर तज्ञांकडून औषधोपचारासह दवाखान्याच्या नव्या जागेत रुग्णांना अॅडमिट होण्याचीही सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच रक्त, लघवीच्या महत्वाच्या तपासण्या केवळ 40 रुपयात केल्या जाणार आहेत. पटवर्धन चौकातील शिववरद प्रतिष्ठानच्या हेल्थक्लबच्या शेजारील प्रशस्त जागेत स्थलांतरित झालेल्या दवाखान्याचे लोकार्पण 9 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता जेष्ठ नागरिकांच्या हस्ते होणार आहे.

शिववरद प्रतिष्ठानचे सचिन भिंगारकर, रोहन डागवाले, मंदार पळसकर, सुभाष दारवेकर, शहाजी डफळ, बाबासाहेब वैद्य, राजेश भरेकर, संजय गलगले, अॅड.वासिम खान, संदीप नामदास, अनील शिंदे, अॅड.सुनील सूर्यवंशी आदि या दवाखानाच्या उभारणीसाठी परिश्रम घेत आहेत

Post a Comment

Previous Post Next Post