मनपा सभापती निवडणूक : उमेदवारीबाबत शिवसेनेचा 'हा' निर्णय?


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महापालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक होत आहे. भाजप उमेदवार फोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसने मनोज कोतकर यांनाच उमेदवारी दिली आहे. तर शिवसेनेकडून योगीराज गाडे यांचा अर्ज दाखल आहे. महाविकास आघाडीच्या वरीष्ठ नेत्यांमध्ये झालेल्या निर्णयानुसार शिवसेना उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याचा निर्णय झाल्याचे व तशा सूचना गाडे यांना देण्यात आल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

निवडणुकीच्या रिंगणात महाविकास आघाडीचेच उमेदवार आमने-सामने असल्यामुळे पेच निर्माण झाला होता. मात्र, महाविकास आघाडी एकसंध राहण्याच्या दृष्टीने शिवसेनेच्या वरीष्ठ नेत्यांकडून उमेदवारी संदर्भात सूचना आल्या आहेत. त्यानुसार या निवडणुकीत शिवसेना उमेदवार अर्ज मागे घेणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिवसेनेकडून अद्याप याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Post a Comment

Previous Post Next Post