विवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
सासरच्या जाचास कंटाळून जया ताजणे (आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) या विवाहितेने घरात दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी घडली.

याप्रकरणी तिघांवर आश्वी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. जया उर्फ चित्रा हिचे राहुल ताजणे बरोबर २०११ मध्ये लग्न झाले होते. सासरकडून होत असलेल्या जाचास कंटाळून तिने शुक्रवारी गळफास घेऊन आत्महत्या केली.

रवींद्र मंडलिक यांच्या फिर्यादीवरून राहुल ताजणे (नवरा), नामदेव ताजणे (सासरा), सुमन ताजणे (सासु) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल व सुमनला अटक करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post