स्व. बाळासाहेब ठाकरे मालमत्ता करमाफी योजनेचा लाभ घ्यावा : आमदार जगताप


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : शासनाने स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींना मालमत्ता कर माफी योजनेची घोषणा केली आहे. राज्यातील माजी सैनिक व त्यांच्या विधवा पत्नींच्या नावावर असलेल्या मालमत्तेवरील करात पूर्णपणे सूट देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले आहे.

ही योजना राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था कार्यक्षेत्रात लागू असणार आहे. त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा मालमत्ता कर भरण्याची गरज नाही. योजनेचा लाभ मिळविण्यासाठी माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकार्‍यांचे प्रमाणपत्र स्थानिक स्वराज्य संस्थेला सादर करणे आवश्यक आहे, असेही जगताप यांनी म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post