अहमदनगर : 62 कोरोना बाधितांची भर; 1055 रुग्णांना डिस्चार्ज


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : जिल्ह्यात आज तब्बल एक हजार 1055 रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 31 हजार 191 इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता 87.93 टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत 62 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 3711 इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा 28,  संगमनेर 04, नगर ग्रामीण 03, श्रीरामपूर 01, कॅंटोन्मेंट 02, नेवासा 02, श्रीगोंदा 12, पारनेर 01, अकोले 01, राहुरी 04, कोपरगाव  01, मिलिटरी हॉस्पिटल 02 आणि शहराबाहेरील 01 अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एक हजार 1055 रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 353, संगमनेर 32, राहाता 118, पाथर्डी 34, नगर ग्रा 96, श्रीरामपूर 71, कॅन्टोन्मेंट 13, नेवासा 58, श्रीगोंदा 33, पारनेर 41, अकोले 33, राहुरी 68, शेवगाव 10, कोपरगाव 34, जामखेड 33, कर्जत 25, मिलिटरी हॉस्पिटल 03 अशा रुग्णांचा समावेश आहे.


  • बरे झालेली रुग्ण संख्या: 31, 191
  • उपचार सुरू असलेले रूग्ण:3711
  • मृत्यू:572
  • एकूण रूग्ण संख्या:35,474


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


Post a Comment

Previous Post Next Post