अहमदनगर : अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना मारहाण


 एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांना आज दुपारी मारहाण झाल्याची घटना घडली. अर्बन बँक कर्ज प्रकरणातील अनियमिततांबाबत ते सातत्याने आवाज उठवत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. गांधी यांना नेमकी मारहाण कोणी केली का केली, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या संदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत असल्याचे गांधी यांनी सांगितले.

नगर अर्बन बँकेच्या कर्ज वाटपातील अनियमिततांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा सुरू आहेत. बँकेतील आर्थिक गैरव्यवहार व अन्य तक्रारींबाबत राजेंद्र गांधी यांनी सातत्याने पाठपुरावा सुरू केला आहे. अनेक प्रकरणात त्यांनी थेट आरबीआयकडे तक्रारी केलेल्या आहेत.

आज गुरुवारी नगर अर्बन बँकेच्या आवारामध्ये राजेंद्र गांधी हे त्यांच्या कामानिमित्त गेले असताना त्यांना या ठिकाणी मारहाण झाल्याने खळबळ उडाली. घटनेनंतर बँकेमध्ये सर्वत्र पळापळ झाली. नेमका हा प्रकार कशामुळे झाला, कोणी मारहाण केली, याचे कारण समोर आलेले नाही. या संदर्भामध्ये राजेंद्र गांधी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी कोतवाली पोलिसात तक्रार दाखल करत असल्याचे सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post