अल-कायदाच्या ९ दहशतवाद्यांना अटक; एनआयएची मोठी कारवाई


एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं (एनआयए) शनिवारी सकाळी पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये छापे टाकत मोठी कारवाई केली. एनआयएनं पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद आणि केरळमधील एर्नाकुलम येथील अनेक ठिकाणांवर छापे टाकले. यादरम्यान दहशतवादी संघटना अल कायदाशी निगडीत असलेल्या ९ दहशतवाद्यांना अटक करम्यात आली. एनआयएनं पश्चिम बंगालमधून सहा तर केरळमधून तीन जणांना अटक केली.

दहशतवाद्यांकडून डिजिटल उपकरणं, काही कागदपत्रं, जिहादी साहित्य, हत्यारं, देशी हत्यारं आणि स्फोटकं तयार करण्याची कागदपत्र आणि अन्य सामग्री जप्त करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार एनआयएला पश्चिम बंगाल आणि केरळसहित देशातील काही ठिकाणी अल कायदाच्या आंतरराज्यीय मॉड्यूल बाबत माहिती मिळाली होती. ही संघटना भारतातील अनेक महत्त्वाच्या ठिकाणी दहशतवादी हल्ला करण्याचा कट रचत असल्याची माहितीही मिळाली आहे.
As per the preliminary investigation, these individuals were radicalised by Pakistan-based Al-Qaeda terrorists on social media and were motivated to undertake attacks at multiple places including the National Capital Region: National Investigation Agency
— ANI (@ANI) September 19, 2020
9 Al-Qaeda operatives arrested by NIA, in raids conducted at multiple locations in Murshidabad, West Bengal and Ernakulam, Kerala https://t.co/iSjTGukEbw
— ANI (@ANI) September 19, 2020
Leu Yean Ahmed and Abu Sufiyan from West Bengal and Mosaraf Hossen & ​Murshid Hasan from Kerala are among the nine Al-Qaeda terrorists arrested by National Investigation Agency (NIA) pic.twitter.com/jMnRjTIjED
— ANI (@ANI) September 19, 2020

सुरूवातीला या लोकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून अल कायदाच्या दहशतवादी संघटनेद्वारे कट्टरपंथी बनवण्यात आलं. तसंच दिल्लीसहित अन्य राज्यांमध्ये हल्ले करण्यास प्रवृत्त करण्यात आलं. यासाठी मॉड्यूल सक्रियपणे पैसे जमवत होते. तसंच हत्यारं आणि स्फोटकं खरेदी करण्यासाठी काही दहशतवादी दिल्लीला जाण्याचीही योजना आखत होते, असं एनआयएकडून सांगण्यात आलं. मुर्शीद हसन, याकूल बिस्वास, मोर्शफ हुसैन, नजुस साकिब, अबू सूफियान, मैनुल मंडल, लियू यीन अहमद, अल मामून कमाल आणि अतितुर रहमान अशी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावं आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post