'स्वीकृत'साठी इच्छुकच नाही; भाजपमध्ये घोडेबाजार : किशोर डागवालेंचा आरोप


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : महानगरपालिकेतील स्वीकृत सदस्यांच्या रिक्त जागांवर 1 ऑक्टोबरला निवडी होणार आहेत. यासाठी शिवसेना, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांमध्ये इच्छुकांनी फिल्डिंग लावली आहे. दरम्यानच्या काळात भाजपचे शहरातील ज्येष्ठ नेते व माजी नगरसेवक किशोर डागवाले हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून स्वीकृत सदस्यपदी निवडले जाणार असल्याची चर्चा शहरात रंगली आहे.

स्वतः किशोर डागवाले यांनी मात्र राष्ट्रवादीत जाण्यासंदर्भातील चर्चेचा स्पष्टपणे इन्कार करत ही अफवाच असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वीकृतसाठी मी इच्छुक नाही. मी कुणाशी संपर्क साधला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनेही माझ्याशी संपर्क केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आपण पण स्वीकृत सदस्य म्हणून सभागृहात जाण्यासही आता इच्छुक नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. भाजपकडून स्वीकृत सदस्य पदासाठी मी मागणी केली होती. मात्र, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात या पदासाठी घोडेबाजार सुरू आहे. त्यामुळे आता स्वीकृतसाठी मी इच्छुकच नसल्याचे डागवाले यांनी म्हटले आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांच्याकडून मला अपेक्षा होत्या. मात्र त्याही फोल ठरल्या, असा टोला डागवाले यांनी गंधे यांना लगावला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post