भाजपचे खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या भेटीला; मराठा आरक्षणासंदर्भात साकडे : खा. विखे


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर : मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे. या आरक्षणासंदर्भात मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत. खासदार छत्रपती संभाजी महाराज यांनी
याबाबत पुढाकार घेऊन आणि पंतप्रधानांना भेटून या प्रश्नाविषयी मार्ग कसा काढता येईल, याबाबत चर्चा करावी अशी विनंती भाजप खासदारांच्या शिष्टमंडळाने केली आहे.

खासदार रक्षा खडसे, खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे, खासदार भारती पवार, खासदार हीना गावित, खासदार उन्मेष पाटील आणि खासदार सुजय विखे पाटील या सर्वांनी आज छत्रपती संभाजी महाराज यांची भेट घेऊन मराठा आरक्षणा संदर्भात त्यांच्याशी चर्चा केली.

मराठा आरक्षणामुळे मराठा समाजाला खऱ्या अर्थाने न्याय मिळेल. हा प्रश्न समाजाच्या जिव्हाळ्याचा असल्याने आपण याबाबत लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्या कानावर समाजाच्या भावना घालाव्यात, अशी विनंती केली आहे. या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा होईल, असा विश्वास खासदार सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post