हरेगावचा मतमाऊली जन्मोत्सव होणार साधेपणाने; ऑनलाईन प्रवचनांचे नियोजन सुरू


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
श्रीरामपूर तालुक्यातील हरेगाव येथील मतमाऊली जन्मोत्सव येत्या रविवारी (१२ सप्टेंबर) साधेपणाने साजरा होणार आहे. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून कोणीही या जन्मोत्सव सोहळ्यास येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, या जन्मोत्सवानिमित्त ऑनलाइन प्रवचने उपक्रमांचे नियोजन सुरू आहे.

हरेगाव येथील मतमाऊली यात्रेस दरवर्षी देशभराती ख्रिश्चन भाविक येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे हरेगाव येथील मतमाउली यात्रा प्रशासकीय आदेशाने रद्द झाली असल्याने भाविकांनी हरेगाव चर्च परिसरात नोव्हेना,दर्शन व जन्मोत्सव आदींसाठी येऊ नये असे आवाहन प्रमुख धर्मगुरू पायस रॉड्रीग्ज यांनी केले आहे. ऑनलाइन प्रवचन उपक्रमात ९ सप्टेंबरला जेरालट रिबेलो,१० सप्टेंबरला पोलि डीसिल्व्हा व ११ सप्टेंबर शेवटच्या नोव्हेनाप्रसंगी प्रकाश तुस्कानो यांची प्रवचने होणार आहेत..मतमाउली जन्मोत्सव दिनी १२ सप्टेंबरला नाशिक धर्मप्रांत महागुरुस्वामी रा.रे.डॉ. लूरडस डानियल यांचे धार्मिक प्रवचन होणार आहे. भाविकांनी आपल्या घरी राहून घरबसल्या 'मतमाउली यात्रा महोत्सव २०२०' या यु ट्यूब चॅनेलवर नोव्हेना, पवित्र मरिया जन्मोत्सवाच्या थेट प्रक्षेपणाचा लाभ घेण्याचे सांगण्यात आले आहे. ज्या भाविकांना नवस-विनंत्या अर्पण करावयाच्या असतील, त्यांनी प्रमुख धर्मगुरूंशी (मो. क्रमांक -९६७३५४१५०५) संपर्क करण्याचे सांगण्यात आले आहे.

प्रशासकीय ताकीद असल्याने भाविकांनी हरेगाव चर्च व परिसरात दर्शनासाठी येऊ नये व दर्शनासाठी स्थानिक धर्मगुरू अथवा संबंधित कर्मचाऱ्यांना आग्रह करू नये व सर्वांनी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post