जया बच्चन-कंगना वादात अमिताभ बच्चन यांचं ट्विट; ट्रोल करणाऱ्यांना उत्तर


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभा खासदार जया बच्चन यांनी संसदेत बॉलिवूडमधील ड्रग्स रॅकेटवरुन सुरु असलेल्या आरोपांवर बोलताना ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत असं म्हणत भाजपा खासदार रवी किशन आणि कंगना रणौतला अप्रत्यक्षपणे टोला लगावला. त्यांच्या या भाषणाचं समर्थन होत असून काहीजण विरोध दर्शवत आहेत. दरम्यान पूर्वकाळजी म्हणून मुंबई पोलिसांनी बच्चन कुटुंबाला सुरक्षा पुरवली आहे. मुंबईमधील घराबाहेर मुंबई पोलिसांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. एनडीटीव्हीने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

बच्चन कुटुंबाच्या जुहू येथील जलसा बंगल्याबाहेर मुंबई पोलिसांची अतिरिक्त सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राज्यसभेतील भाषणानंतर जया बच्चन सोशल मीडियावर ट्रोल होत असून सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई पोलिसांकडून सुरक्षा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी ट्विट करत जया बच्चन यांना ट्रोल करणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलं आहे.

भाजपा खासदार रवी किशन यांनी राज्यसभेत बॉलिवूडमधील ड्रग्स सेवनाचा मुद्दा मांडला होता. त्यावरुन जया बच्चन यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटलं की, “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा. केवळ काही लोकांमुळे संपूर्ण इंडस्ट्रीचं नाव खराब होऊ शकत नाही”.

Post a Comment

Previous Post Next Post