हिरोसोबत झोपल्यानंतरच..; जया बच्चन यांना प्रत्युत्तर देताना कंगनाचा नवा आरोप


एएमसी मिरर वेब टीम 
मुंबई : कंगनाने जया बच्चन यांच्या टीकेला उत्तर देणारं ट्विट केलं असून जया बच्चन आणि इंडस्ट्रीने मला कोणतीही ‘थाळी’ दिली नसल्याचं म्हटलं असून शय्यासोबत केल्यानंतर बॉलिवूडमध्ये दोन मिनिटांची भूमिका मिळते असा आरोप केला आहे.

कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे की, जयाजी आणि त्यांच्या इंडस्ट्रीने कोणती थाळी दिली आहे. एक थाळी मिळाली होती ज्यामध्ये दोन मिनिटांचे आयटम नंबर्स आणि एक रोमँटिक सीन मिळायचा तोदेखील हिरोसोबत झोपल्यानंतर…मी इंडस्ट्रीला स्त्रीवादाचा धडा दिला. थाळी देशभक्ती, स्त्रीप्रधान चित्रपटांनी सजवली. जयाजी ही माझी थाळी आहे तुमची नाही.

जया बच्चन यांनी कंगनाचं नाव न घेता अप्रत्यक्षपणे टीका केली होती. यानंतर कंगनाने लगेचच ट्विट करत माझ्या जागी तुमची मुलगी श्वेता असती तर तुम्ही असंच म्हणाला असता का असा सवाल विचारला होता. इतकंच नाही तर अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? असा सवाल विचारत आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा असं म्हटलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post