आजपासून आवाजावरून कोरोना चाचणीला सुरुवात


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
आवाजावरून 30 सेकंदांत कोरोनाचे निदान करणाऱ्या प्रायोगिक चाचणीला गोरेगावच्या नेस्को कोरोना सेंटरमध्ये सुरुवात होणार आहे. त्यासाठी मोबाईल ऍपच्या स्वरूपातील दोन उपकरणांचा वापर केला जाणार आहे. या पद्धतीने कोरोनाची 80 टक्के अचूक चाचणी करता येते, असा दावा हे उपकरण बनवणाऱ्या 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीने केला आहे. 500 कोरोना रुग्णांवर होणारा देशातील हा अशा प्रकारचा पहिला प्रयोग आहे.

कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका अहोरात्र मेहनत घेत आहे. कोरोनाच्या 'आरटी-पीसीआर' चाचणीसह अर्ध्या तासात निदान होणाऱ्या अँटिजेन चाचण्यांची संख्याही वाढवली गेली आहे. सुरुवातीला एक लाख अँटिजेन टेस्ट वाढवल्यानंतर आता पुन्हा 50 हजार अँटिजेन टेस्ट कीट मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोरोनाचे निदान झटपट होणार आहे. मात्र, आता अँटिजेनपेक्षाही अधिक वेगाने कोरोनाचे निदान करण्यासाठी 'व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स' म्हणजे आवाजावरून कोरोनाचे निदान करण्याची पद्धत इस्रायलने विकसित केली असून त्यामुळे 30 सेकंदांत कोरोनाचे निदान होणार आहे. ही पद्धत खात्रीशीर असल्याचे प्रयोगात सिद्ध झाले तर त्याचा वापर मुंबईत कोरोना चाचणीसाठी केला जाणार आहे. मराठी, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषेत आवाजाचे नमुने गोळा केले जाणार आहेत. नायर रुग्णालयाने या संशोधनात्मक प्रयोगाला परवानगी दिली असून उद्यापासून याची सुरुवात होणार आहे, अशी माहिती नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी दिली.

2 Comments

  1. Very useful and easy tool for diagnosis. Should be used extensively. Screening of large population will be possible without any invasive technique, may be from a distance

    ReplyDelete

Post a Comment

Previous Post Next Post