अमेरिकेत कोरोनाची लस 3-4 आठवड्यात मिळेल : ट्रम्प


एएमसी मिरर वेब टीम 
वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या कहरात अमेरिकेतील लोकांना लवकरच एक चांगली बातमी मिळू शकेल. अमेरिकेत कोरोना विषाणूची लस तीन-चार आठवड्यात बनवू, असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्रअध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे. मंगळवारी पेनसिल्व्हेनिया येथे ‘एबीसी न्यूज’द्वारे आयोजित चर्चा सत्रात डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, ‘मागील प्रशासनाला एफडीए आणि इतर सर्व संस्थांच्या मान्यता घेण्यासाठी लागणाऱ्या कालावधीमुळे लस तयार करण्यास अनेक वर्षे लागत होती. मात्र आम्ही काही आठवड्यातच ही लस बनवू. यासाठी कमीत कमी तीन किंवा चार आठवडे लागू शकतात.’

कोरोना संकटावर ट्रम्प म्हणाले, ‘आपण ठीक होत आहोत आणि हा आजार लांब जात आहे. कोरोना लस शिवाय संसर्ग कमी होत आहे. मला असे वाटते मी लॉकडाऊन करून काय केले, मी जवळजवळ 25 लाख किंवा त्याहूनही अधिक लोकांचे जीव वाचविले. मला वाटते आम्ही खूप चांगले काम केले. मला नाही माहित याला महत्व मिळणार की नाही.’ दरम्यान, अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post