या अभिनेत्री म्हणतात.. आम्ही साधी सिगारेटही ओढत नाही

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
बॉलीवूड ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोलतर्फे अभिनेत्री दीपिका पदुकोण, श्रद्धा कपूर, सारा अली खान आणि रकुल प्रीत सिंग यांची चौकशी नुकतीच करण्यात आली असून या चौकशीत आपण कधीच ड्रग्ज सेवन केले नसल्याचा दावा या अभिनेत्रींनी कडून करण्यात आला आहे. इतकेच नाही तर आपण कधी सिगारेट देखील ओढली नसल्याचा दावा या चारही अभिनेत्रीकडून करण्यात आला आहे. तर दुसरीकडे ज्या व्हाट्सअप ग्रुपवर हा सर्व प्रकार उघडकीस आला त्यातील ‘डूब’ म्हणजे हातात रोल केलेली सिगारेट, असा दावा या अभिनेत्रींनी केल्याचे सांगितले जात आहे.

आर्थिक व्यवहार रडारवर
एनसीबीकडून लवकरच या चारही अभिनेत्रींच्या आर्थिक व्यवहाराची चौकशी होणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्या क्रेडिट कार्डसह इतर माहिती एनसीबीकडून तपासली जाणार असून त्यांनी कोणत्याही ड्रग्ज पेडलरला पैसे दिले आहेत का? याचा तपास या माध्यमातून केला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एनसीबी दबाव टाकत असल्याचा क्षितीजचा आरोप
एनसीबी कडून धर्मा प्रोडक्शनचे क्षितिज प्रकाश याना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात आपण करण जोहरचे नाव घ्यावे, यासाठी एनसीबी आपल्यावर दबाव टाकत असल्याचा आरोप क्षितीजने न्यायालयात सुनावणी दरम्यान केला आहे. एनसीबीने मात्र हे आरोप फेटाळून लावले असून, त्याच्या घरातून आपल्याला गांजा सापडल्याची माहिती यावेळी न्यायालयात दिली.

Post a Comment

Previous Post Next Post