तिन्ही पक्षांपेक्षा आमची संख्या जास्त, पण आज आम्ही विरोधी बाकांवर : फडणवीस


एएमसी मिरर वेब टीम 
पाटणा : विरोधीपक्ष पूर्णपणे सहकार्य करत आहे. अगदी पहिल्या दिवसापासून भाजपा सरकारसोबत आहे. महाराष्ट्रात आमचा पक्ष सर्वात मोठा आहे. तिन्ही पक्षांपेक्षा आमचा पक्ष मोठा आहे, पण आज आम्ही विरोधी बाकांवर बसलेलो आहोत. विरोधी बाकांवर बसलेलो असलो, तरी आम्ही स्पष्टपणे सांगितलेलं आहे की, करोनाच्या संकटात आम्ही कसलंही राजकारण करणार नाही, असं विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी म्हटले आहे.

राज्यात करोनाबरोबरच इतर मुद्यांवरूनही राजकारण धुमसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णांच्या संख्येत चिंताजनक वाढ होत असतानाच अभिनेत्री कंगना रणौतनं केलेल्या विधानांवरून राजकारण पेटलं होतं. त्यावर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामोल्लेख टाळत विरोधी पक्ष असलेल्या भाजपासह कंगनालाही टोला लगावला होता. त्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर फडणवीस यांनी उत्तर दिलं. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहारची जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सध्या ते विविध भागांचा दौरा करून आढावा घेत आहेत. आज बौद्धगया येथे झालेल्या बैठकीनंतर फडणवीस यांची पत्रकार परिषद झाली. फडणवीस यांना राज्यात गाजत असलेल्या मुद्यांसदर्भात काही प्रश्न विचारण्यात आले.

फडणवीस म्हणाले, आज महाराष्ट्रात करोनाचं मोठं संकट आहे. आजघडीला १० लाखांपेक्षा जास्त करोनाचे रुग्ण आहेत. देशात करोनामुळे झालेल्या एकूण मृत्यूपैकी चाळीस टक्के मृत्यू महाराष्ट्रातील आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्रात दिवसाला २३ ते २५ हजार रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मला वाटतंय की आमच्या मुख्यमंत्र्यांनी करोनाच्या संकटावर अधिक लक्ष दिलं पाहिजे. राजकारण, कंगनाचा विषय किंवा त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडून नेव्ही अधिकाऱ्यावर झालेला हल्ला या सगळ्या गोष्टींकडे त्यांचं लक्ष असलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात आधी त्यांनी करोनाशी लढाई लढावी. ना विरोधी पक्षासोबत वा कंगनासोबत, असा टोला फडणवीस यांनी लगावला.

Post a Comment

Previous Post Next Post