मुलगी प्रियकराला गेली भेटायला; वडिलांनी उचलले टोकाचे पाऊल


एएमसी मिरर वेब टीम 
लखनऊ : एक मुलगी आपल्या रात्री प्रियकराला भेटायला गेली. मुलीच्या वडिलांना जेव्हा ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांच्या तळपायातील आग मस्तकात गेली आणि रागाच्या भरात मुलीवर कुर्‍हाडीने वार केला. त्यात मुलीचा जागीच मृत्यू झाला.

उत्तर प्रदेशमध्ये एक मुलगी आणि मुलाचे प्रेमसंबंध होते. दोघेही शेजारी शेजारी राहत होते. रात्री मुलगी मुलाला भेटायला त्याच्या घरी गेली. मुलाच्या वडिलांना जेव्हा कळाले तेव्हा त्यांनी मुलीच्या वडिलांकडे तक्रार केली. तेव्हा मुलीच्या वडिलांनी कुर्‍हाडीने मुलगा आणि मुलीवर हल्ला केला. या हल्ल्यात मुलगी जागीच ठार झाली. जखमी मुलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. आरोपी वडील याने घटनास्थळी पळ काढून फरार झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post