उद्धव ठाकरेंकडून पंतप्रधान मोदींना शुभेच्छा

 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज (१७ सप्टेंबर) ७० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्यांच्यावर जगभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सोशल मीडियावर त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केल्या जात आहेत. अनेक देशांच्या राष्ट्रप्रमुखांसह नेत्यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री, नेते आणि मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. महाविकास आघाडीचे सरकार आल्यापासून पंतप्रधान मोदींच्या ध्येय धोरणांवर टीका करणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही मोदींना शुभेच्छा दिल्या.

“आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! तुमची कायम निरोगी व तंदुरूस्त राहा हीच प्रार्थना. दीर्घायुष्यासाठी सदिच्छा”, अशा आशयाचे ट्विट करत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शुभेच्छा दिल्या.

उद्धव ठाकरेंशिवाय भारतातील आणि जगभरातील नेतेमंडळींनी मोदींना शुभेच्छा दिल्या. खासदार आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ट्विटरवरुन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. नेपाळचे पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा, मी आपल्या चांगल्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी प्रार्थना करतो. दोन्ही देशांच्या संबंधांना अधिक मजबूत करण्यासाठी मिळून काम करुयात, असे ट्विट त्यांनी केले. फिनलँडच्या पंतप्रधान सना मरीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांचे संबंध आणखी चांगल्या प्रकारे पुढे नेण्याची आशा आहे, असं त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे.

Post a Comment

Previous Post Next Post