भाजप नेते म्हणताहेत.. योगींच्या राज्यात कधीही गाडी पलटी होऊ शकते

 

एएमसी मिरर वेब टीम
नवी दिल्ली :
हाथरस प्रकरणावरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेशातील भाजपाचं सरकार टीकेचं धनी ठरलं आहे. हाथरस सामूहिक अत्याचारातील पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. हाथरस प्रकरणावर बोलताना भाजपाच्या महासचिवांनी अजब वक्तव्य केलं आहे. आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना तुरूंगात पाठवण्यात येणार असून, योगीजी हे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत आणि तिथे कधीही गाडी उलटू शकते, असं वक्तव्य भाजपा नेत्यानं केलं आहे. एएनआयने याबाबत वृत्त दिले आहे.

उत्तर प्रदेशमधील हाथरसमध्ये १९ वर्षीय तरुणीवर सर्वण समाजातील चौघांनी सामूहिक बलात्कार केला होता. दोन आठवड्यापूर्वी ही घटना घडली होती. आज उपचारांदरम्यान मृत्यू झाला. दिल्लीच्या सफदरजंग येथील रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरु होते. चार सवर्ण तरुणांनी बलात्कार करुन तरुणीची जीभ कापून, तिची मान मोडण्याचं अमानुष कृत्य केलं होतं. या घटनेवर देशभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. त्याचबरोबर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही उपस्थित केला जात आहे.


विजयवर्गीय यांना हाथरस प्रकरण बेजबाबदारपणे हाताळण्यात आल्यासंदर्भात पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला. या प्रकरणावर बोलताना भाजपाचे महासचिव कैलास विजयवर्गीय म्हणाले, आरोपींनी अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवण्यात येणार आहे. मला वाटत थोडा संयम ठेवायला हवा. आरोपींना लवकरच तुरूंगात पाठवण्यात येणार आहे. कारण योगीजी, जे की तिथले मुख्यमंत्री आहेत. मला माहिती आहे की, त्यांच्या प्रदेशात कधीही गाडी पलटी होते, असं विधान कैलास विजयवर्गीय यांनी केलं आहे.

विकास दुबेची गाडी झाली होती पलटी

उत्तर प्रदेशातील आठ पोलिसांची हत्या करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबे याला उत्तर प्रदेश पोलिसांनी चकमकीत ठार केलं होतं. विकास दुबेला अटक केल्यानंतर विशेष पथक त्याला घेऊन कानपूरला चाललं होतं. यावेळी पोलिसांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघात झाला. यानंतर विकास दुबेनं पळून जाण्याचा प्रयत्न केला. विकास दुबे याने पोलिसांचं शस्त्र घेऊन गोळीबार करण्यास सुरुवात केली. पोलिसांनी विकास दुबेला आत्मसमर्पण करण्यास सांगितलं. यादरम्यान झालेल्या चकमकीत पोलिसांनी विकास दुबेला ठार केलं होतं.

Post a Comment

Previous Post Next Post