पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांमध्ये गोळीबार; 100 ते 200 राऊंड फायर


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देशांमध्ये शांतता राखण्यासाठी विविध स्तरांवर चर्चा केल्या जात आहेत. अशातच मॉस्कोत भारत-चीन परराष्ट्रमंत्र्यांच्या चर्चेआधी एलएसीवर गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, 10 सप्टेंबर रोजी मॉस्कोत भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयंशकर आणि चिनचे परराष्ट्रमंत्री समकक्ष वांग यी यांच्या भेटीआधी दोन्ही देशांतील सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळ गोळीबाराची घटना घडली होती. ही घटना अत्यंत तीव्र आणि मोठी असल्याचं समोर आलं आहे.

पँगाँग सरोवराच्या उत्तरेकडील किनाऱ्याजवळील एलएसीवर वर्चस्व मिळवण्याच्या दृष्टिकोनातून हा गोळीबार करण्यात आला होता. दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये पँगाँग सरोवराच्या एलएसीजवळ 100 ते 200 गोळ्यांचं राऊंड फायरिंग करण्यात आलं. तसेच ही फायरिंग एकमेकांवर न करता हवेत करण्यात आली असल्याचीही माहिती मिळत आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीनचे जवळपास 50 हजार सैनिक पूर्व लडाखजवळ असलेल्या एलएसीवर तैनात आहेत. भारतानेही मिरर-डिप्लोयमेंट करत, चीनच्या बरोबरीने सैन्य एलएसीवर तैनात केलं आहे. दरम्यान, दोन देशांमध्ये पार पडलेल्या ब्रिगेडियर स्तराच्या बैठकीत काहीही तोडगा न निघाल्यामुळे येत्या काही दिवसांत कोअर कमांडर स्तराची बैठक बोलावण्यात येणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post