त्यांची अस्मिता राज्याशी की व्यक्तीशी? कंगना प्रकरण आत्मपरिक्षण करायला लावणारे : आगरकर


एएमसी मिरर वेब टीम 
अहमदनगर : अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करणे गैर आहेच, पण या गोष्टीचा निषेध करुन कंगनाचा संबंध भाजपाशी जोडणारे पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, राज्यपाल यांच्याबाबत अपशद्ब काढत असताना कोणत्या बिळात लपून बसले होते? त्यांची अस्मिता राज्याशी आहे की, व्यक्तीशी आहे? असा सवाल भाजप नेते अ‍ॅड.अभय आगरकर यांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्र, मुंबईबाबत कंगनाने केलेल्या वक्तव्याचा भाजपाने निषेध केल्याकडे लक्ष वेधून आगरकर म्हणाले की, कंगना प्रकरण अनेकांना आत्मपरीक्षण करायला लावणारे आहे. एका महिलेशी आपली वागणूक किती खालच्या पातळीवर घसरु शकते हे शिवसेनेने दाखविले. शिवसेनेमुळे सत्तेचे पद मिळालेले नको ती बडबड करत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांची प्रतिष्ठा राज्यासाठी निश्चितच महत्वाची आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी विधानसभेत ते स्पष्ट केले आहे. पण ठाकरे यांना ऐकरी शब्द वापरला म्हणून अस्मितेचे तुणतुणे वाजविणारे यापूर्वी कुठे गेले होते? त्यांची अस्मिता राज्याशी आहे की, व्यक्तीशी आहे? माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या पत्नी यांच्याबद्दल अपशब्द वापरले जात होते, त्यावेळी संस्कृती कुठे गेली होती. ते देखील त्यावेळी मुख्यमंत्री होते. त्यांच्याबद्दल अपशद्ब ऐकून टाळ्या पिटणारे आज राज्याच्या अस्मितेबाबत गळा काढत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

एका महिलेशी लढण्यासाठी सरकारला मुंबई महापालिकेची यंत्रणा वापरावी लागणे दुदैवी आहे. वाघ म्हणून घेणार्‍यांची एका महिलेपुढे शेळी झालेले देशाने पाहिले आहे. दाऊद इब्राहीमचे धमकीचे फोन आल्यावर रागापोटी त्याची मुंबईतील बेकायदा बांधकामे पाडण्याची हिंमत झाली नाही. कंगना राणावत घरी नसताना तिचे बांधकाम पाडण्यात कोणती मुर्दमकी आहे? तिचे नाव स्वच्छता गृहाला देण्याची हिणकस प्रकारची मानसिकता राज्यात महिलांचा आदर राखतील का? कंगणाचे बांधकाम पाडल्यामुळे न्यायायाने खडे बोल सुनावले. निदान आता तरी हिणकस मर्दुमकी थांबवावी व दुसर्‍यांना दोष देणे बंद करावे, असा सल्ला अ‍ॅड.आगरकर यांनी दिला.

Post a Comment

Previous Post Next Post