‘माझ्याजागी तुमची मुलगी असती तर..’; कंगनाचं जया बच्चन यांना उत्तर


एएमसी मिरर वेब टीम 
नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाचा सध्या तपास सुरु आहे. या तपासकार्यादरम्यान, कलाविश्वातील अनेक गोष्टी उघड होताना दिसत आहेत. यामध्येच कलाविश्वातील ड्रग्स पार्टी हा नवा मुद्दा चर्चेत आला असून अभिनेत्री कंगना रणौतने याविषयी भाष्य केलं आहे. मात्र अनेकांनी कंगनावर निशाणा साधला असून समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनीदेखील कंगनाला टोला लगावला आहे. मात्र आता कंगनाने जया बच्चन यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“जयाजी, माझ्या जागी तुमच्या मुलीला श्वेताला जर किशोरवयात कोणी मारहाण केली असती, तिला ड्रग्स दिले असते आणि तिच्यासोबत गैरवर्तणूक केली असती, तर तेव्हादेखील तुम्ही असंच म्हणाला असतात का? तसंच अभिषेक सातत्याने छळ व गुंडगिरीचा त्रास होतोय अशी तक्रार करत असेल आणि एक दिवस तो अचानक फासावर लटक्याचं दिसून आला तर ? आमच्यासाठी सुद्धा कधीतरी प्रेमाने हात जोडण्याचा प्रयत्न करा”, असं ट्विट कंगनाने केलं आहे. सोबतच तिने जया बच्चन यांचा सभागृहातील व्हिडीओदेखील शेअर केला आहे.

दरम्यान,सभागृहात शून्य प्रहरामध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीचा मुद्दा मांडण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड इंडस्ट्रीला काही लोकं बदनाम करत असल्याचं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेत केलं होतं. “मनोरंजन विश्वातील लोकांना सोशल मीडियावर वाटेल ते बोललं जातंय. ज्यांनी इंडस्ट्रीत राहून नाव कमावलं, तेच आता इंडस्ट्रीला गटार म्हणतायत. माझा याला पूर्ण विरोध आहे. लोकांनी अशा प्रकारची भाषा वापरू नये असं सरकारकडून सांगण्यात यावं अशी मी आशा करते. इंडस्ट्रीने नेहमीच चांगल्या उपक्रमांसाठी सरकारला मदत करायला पुढाकार घेतला आहे. आता सरकारने इंडस्ट्रीला पाठिंबा द्यावा”, असं त्या म्हणाल्या.

Post a Comment

Previous Post Next Post