'माझं ऑफिस तोडून लोकांचा रोजगार हिरावणारे बेरोजागार दिवस साजरा करत आहेत'


 

एएमसी मिरर वेब टीम
मुंबई :
माझं ऑफिस तोडून ती जागा स्मशानभूमीसारखी करुन टाकली. त्यामुळे तिथे काम करणाऱ्यांचा रोजगार गेला. एका फिल्म युनिटमुळे काही शे लोकांचा उदरनिर्वाह चालतो. एक सिनेमा रिलिज होऊन थिएटरपर्यंत पोहचतो तेव्हा तो पॉपकॉर्न विकणाऱ्याचंही घर चालवतो. अशा सगळ्यांचे रोजगार हिरावणारे लोक आज राष्ट्रीय बेरोजगार दिवस साजरा करत आहेत. या आशयाचं ट्विट करत कंगना रणौतने शिवसेनेवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. 

 मेरे कर्म स्थान को शमशान बना दिया, नजाने कितने लोगों का रोज़गार छीन लिया, एक फ़िल्म यूनिट कई सौ लोगों को रोज़गार देतीं है, एक फ़िल्म रिलीज़ होकर थीयटर से लेकर पॉप्कॉर्न बेचने वाले का घर चलती है, हम सब से रोज़गार छीन के वो लोग आज #NationalUnemploymentDay17Sept मना रहे हैं 🙂 pic.twitter.com/UaEvI4nSE8

कंगनाने तिच्या ऑफिशियल ट्विटर हँडवर तिच्या ऑफिसवर जी तोडक कारवाई करण्यात आली त्याचे फोटो पोस्ट केले आहेत. ते पोस्ट करुन तिने शिवसेनेवर नाव न घेता टीका केली आहे.Post a Comment

Previous Post Next Post