'आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवीये'


एएमसी मिरर वेब टीम
मुंबई : मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी केलेल्या वक्तव्यावरून संतप्त प्रतिक्रियेला सामोरं जावं लागलेल्या अभिनेत्री कंगना राणावतने पुन्हा एकदा राज्य सरकारवर टीका करताना महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. कंगनानं यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. ज्यातून तिने राज्य सरकारचा उल्लेख फॅसिस्ट सरकार असा केला आहे.

आधी सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरून बॉलिवूड कलाकारांवर निशाणा साधणाऱ्या अभिनेत्री कंगनानं मुंबई पोलिसांविषयी वादग्रस्त ट्विट केलं. या ट्विटनंतर तिच्यावर टीका झाली. यात शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनीही कंगनाला सुनावलं. त्यानंतर तिने मुंबईची तुलना थेट पाकव्याप्त काश्मिरशी केली होती.

सध्या कंगना हिमाचल प्रदेशातील तिच्या घरी असून, अजूनही हा वाद शमल्याचं दिसत नाही. कंगनानं आणखी एक ट्विट करत महाराष्ट्र सरकारला लक्ष्य केलं आहे. करोना महामारीमुळे महाराष्ट्रातील गंभीर परिस्थिती अजूनही कायम आहे. रुग्णसंख्या वेगानं वाढत आहे, पण फॅसिस्ट सरकार त्यांच्या विरोधात बोलणाऱ्या लोकांना त्रास देण्यात व्यस्त आहे. आम्हाला महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट हवी आहे. फॅसिझम थांबवा, असं ट्विट करत कंगणानं राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे.


उर्मिला मातोंडकर यांच्यावर अशोभणीय टीका
उर्मिला मातोंडकर सॉफ्ट पॉर्न स्टार आहे. त्या अभिनयासाठी तर नक्कीच ओळखल्या जात नाहीत, अशा शब्दांत अभिनेत्री कंगना रणौतने उर्मिला मातोंडकर यांच्यावर टीका केली. ‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत कंगना म्हणाली होती, “मी उर्मिला मातोंडकर यांनी दिलेली एक मुलाखत पाहिली. संपूर्ण मुलाखतीत त्या मला चिडवत होत्या. माझ्या संघर्षाची खिल्ली त्यांनी उडवली. भाजपाकडून तिकिट मिळावं यासाठी मी हे सर्व बोलत असल्याचं त्यांनी म्हटलं. पण मला तिकिट मिळवणं काही इतकं अवघड नाही, हे एखाद्या हुशार व्यक्तीला सहज समजेल. त्यासाठी मी माझ्या आयुष्याशी खेळणार नाही आणि माझ्या संपत्तीचीही वाट लावून घेणार नाही. उर्मिला मातोंडकर या सॉफ्ट पॉर्न स्टार आहेत. त्या त्यांच्या अभिनयासाठी नक्कीच ओळखल्या जात नाहीत. कशामुळे ओळखल्या जातात मग? सॉफ्ट पॉर्नसाठीच ना? जर त्यांना तिकिट मिळू शकतं, तर मला का नाही मिळणार? कोणालाही तिकिट मिळू शकतं,” अशी कंगनानं केली होती. ज्यावरून बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिला सुनावलंही होतं.

Post a Comment

Previous Post Next Post