इंटक संघटना एसटीच्या काचेवर लावणार 'ते' पोस्टर; शुक्रवारी गांधीगिरी आंदोलन

 

एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने शुक्रवारी-२ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी एसटी बसच्या डाव्या साईडच्या काचेवर 'जुलमी परिपत्रके काढून अन्याय केला जात आहे. ३ महिन्यापासून पगार मिळालेला नाही, तरीपण आम्ही सेवा देत आहोत.', अशा आशयाचे स्टीकर लावून गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे.

एसटी बचाव-कामगार बचाव अभियानांतर्गत राज्यातील सर्व आमदार व खासदार यांना निवेदन देऊन एसटी महामंडळास आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करून एसटी कर्मचा-यांचे पगार द्यावेत अशी विनंती केली, परंतु एसटी कर्मचा-यांचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचे वेतन रखडले याशिवाय दररोज नवीन परिपत्रक काढून कामगारांवर अन्याय केला जात असून कामगारांमध्ये भीतीचे व असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर तसेच भविष्यात कोणतेही आंदोलन अथवा संप करण्याची वेळ आल्यास प्रवाशांना याबाबत माहिती असावी व वास्तव कळावे यासाठी नावीन्यपूर्ण गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार जयप्रकाश छाजेड व सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

एस.टी. कर्मचा-यांचे माहे जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर या महिन्याचे वेतन ७ ऑक्टोबर २०२० पर्यंत वेतन प्रदान अधिनियम १९३६ या कायदयानुसार देण्यात यावे. अन्यथा, महाराष्ट्र एस.टी. वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल तसेच फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी कायदेशीर नोटीस वकिलामार्फत एसटी महामंडळाचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांना देण्यात आलेली असून एसटी कर्मचा-यांना वेतन न मिळाल्यास होणा-या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी एसटी महामंडळाची असल्याचे संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post