पालकमंत्री हसन मुश्रीफ ‘पॉझिटिव्ह’; अधिकारी, नेतेमंडळी गॅसवर

 


एएमसी मिरर वेब टीम
अहमदनगर :
जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांचा कोरोना अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यांनी स्वतःच ट्विटरवरुन ही माहिती जाहीर करत संपर्कात आलेल्या सर्वांना तपासणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे.

दरम्यान, पालकमंत्री मुश्रीफ यांनी कालच (दि.17) नगरमध्ये अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली होती. यावेळी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकारी, काही प्रमुख राजकीय मंडळी या बैठकीला व त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेला उपस्थित होती. पालकमंत्री मुश्रीफ यांना अनेकांनी भेटून निवेदनेही दिली होती. त्यानंतरच दुसर्‍याच दिवशी पालकमंत्र्यांचा अहवाल ‘पॉझिटिव्ह’ आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यांच्याशी संपर्कात आलेल्या अधिकार्‍यांसह राजकीय नेते मंडळी सध्या गॅसवर आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post